pub-4831510980238704, जाणून घ्या, खाजगीरित्या बचाव करण्याचा अधिकार: Right of Private Defence in IPC Section 96 Part- I

जाणून घ्या, खाजगीरित्या बचाव करण्याचा अधिकार: Right of Private Defence in IPC Section 96 Part- I

Introduction and Section 96 of Indian Penal Code 1860

Introduction: Self-help is the first rule of criminal law. The Indian Penal Code, 1860 has given the right of private defence of body and property to every Individual. Section 96 to 106 of Indian Penal Code states the law relating to the right of Private Defence of person and property. It is primary duty of the State to protect life and property of citizens. But the fact is that State cannot watch each and every activity of the citizens. There may be situations in which the State cannot help person immediately when his life or property is in danger. 
In view of this Indian Penal Code has given the right of private defence of body and property of every individual. Right of Private Defence: कोणत्याही देशाच्या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या जिवित्वाचे आणि त्याच्या संपत्तीचे, मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी ही त्या राज्याची म्हणजेच सरकारची असते. परंतू एखाद्याचा जीव धोक्यात आला असता किंवा मालमत्तेला धोका निर्माण झाला असता, त्यावर तात्काळ कारवाई करणे कोणत्याही सरकारला शक्य होत नसते. त्यामूळे एखाद्या व्यक्तीने त्याचा बचाव करण्यासाठी पुरेसे कायदीय संरक्षण मिळणे अपेक्षित आहे. शिवाय, स्वतःची मदत करणे, बचाव करणे हा फौजदारी कायद्याचा पहिला नियम आहे. त्यामूळेच या अधिकाराला स्वतः बचाव करणे 

भारतीय दंड संहिता- 1860 मध्ये सुद्धा कलम 96 ते 106 मध्ये खाजगीरित्या बचाव करण्याचा अधिकारबाबत तरतूदी करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध विचारवंत बेंथम यांच्याच शब्दात सांगायचे तर, “स्वतःच्या जिवित्वाचे, स्वातंत्र्याचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी खाजगीरित्या बचाव करण्याचा अधिकार हा अत्यंत गरजेचा आहे”. (In the words of Bentham, "The Right of Private Defence is absolutely necessary for the protection of ones life, liberty and property.)

The law of private defence is based on two main principles -
(a) Everyone has right to defend his own body and property and another's body and property.
(b) The Right of Private Defence is not applicable in those cases where accused himself is an aggressive party.

खाजगीरित्या बचाव करण्याचा अधिकार दोन तत्वांवर अधारीत आहे. 1) प्रत्येकाला स्वतःचा आणि दुसर्‍याचा सुद्धा जीव/शरीर आणि मालमत्ता याचे रक्षण करण्याचा अधिकार आहे आणि 2) हा अधिकार आरोपीच आक्रमक असेल तर लागू होणार नाही.

1) Things done in private defence (Section 96) : Nothing is an offence which is done in the exercise of the right of private defence. खाजगीरित्या बचाव करण्याच्या हक्काविषयी हे कलम असून या कलमात खाजगीरित्या बचाव करण्याचा हक्क बजावण्यासाठी केलेली कोणतीही गोष्ट अपराध होत नाही, असे हे कलम सांगते. म्हणजेच आपल्या जिवित्वाला, संपत्तीला धोका निर्माण झालेला असताना एखादा व्यक्ती त्याचा बलपुर्वक प्रतिकार करू शकतो, प्रसंगी समोरच्या व्यक्तीचा खून सुद्धा करू शकतो.

याबाबत सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी व्यक्त केलेली मते अशी आहेत: 1) स्वतःचा बचाव करण्याचा हक्क महत्वाचा हक्क आहे व त्याचा संकूचितपणे अर्थ लावू नये. 2) कोणास किती जखमा झाल्या यावरून आक्रमक कोण हे ठरवता येणार नाही. 3) मूक्त लढाईत स्वतःचा बचाव करण्याचा हक्क उद्भवत नाही. 4) जर पोलिसांची मदत मिळण्यासाठी संधी व वेळ असेल तर स्वतःचा बचाव करण्याचा हक्क उद्भवत नाही. 5) आपण केलेले कृत्य बचावासाठी केले होते असे जरी आरोपीने न्यायालयात बचावात्मक सांगितले नसले तरी समोर आलेल्या पुराव्यावरून तसे पाहण्याचा व ठरविण्याचा अधिकार कोर्टास आहे.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने