प्रथमच साजरा होणार सर्वोच्च न्यायालयाचा स्थापना दिवस
Supreme Court of India: Image Courtesy Google |
स्वातंत्र्यानंतर भारतातील सर्वोच्च न्यायालय नवी दिल्लीत 28 जानेवारी 1950 रोजी स्थापन करण्यात आले होते. तत्पुर्वी हरीलाल जेकीसुनदास कनीया यांची 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे मुख्य न्यायमर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरवर्षी 28 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाचा स्थापना दिवस एक औपचारीकता म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी मात्र हा दिवस प्रथमच मोठ्या स्वरूपात आणि सार्वजनिकरित्या साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमूख पाहूणे म्हणून सिंगापूरचे मुख्य न्यायमुर्ती सुंदरेश मेनन हे उपस्थित राहणार असून यावेळी ते बदलत्या काळात न्यायपालिकेची भुमिका या विषयावर बोलणार आहेत. यावेळी मुख्य न्यायमुर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमुर्ती एस.के. कौल हे सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत.
The Supreme Court of India would be celebrating its foundation day for the very first time on February 4. The Chief Guest for the occasion is Chief Justice of Singapore, Justice Sundaresh Menon and he will speak on the Role Of Judiciary In the changing world. CJI DY Chandrachud and Justice SK Kaul will also speak on the occasion. It is pertinent to note that the Supreme Court of India was established on January 28, 1950.
भारतीय न्यायालयांचा थोडक्यात ईतिहास
स्वातंत्र्यापुर्वी भारताचे सर्वोच्च न्यायालय, 1773 च्या रेग्युलेटींग अॅक्टनुसार फोर्ट विल्यम, कलकत्ता येथे 1774 मध्ये स्थापन झाले होते. त्याला भारतातील सर्वोच्च न्यायालयाचा दर्जा देण्यात आला होता. नंतर कलकत्ता येथे 26 जून 1862 रोजी कलकत्ता हायकोर्टाची स्थापना करण्यात आली. तर नंतर 14 ऑगस्ट 1862 रोजी बॉम्बे हायकोर्ट स्थापन झाले. त्यानंतर 17 मार्च 1866 रोजी अल्लाहाबाद हायकोर्टाची स्थापना करण्यात आली.