pub-4831510980238704, IPC 306: ॲम्बुलन्स चालकाच्या मृत्यूप्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर

IPC 306: ॲम्बुलन्स चालकाच्या मृत्यूप्रकरणी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर

हिंगोली: हिंगोली शहरात रीसाला बाजार भागात जिल्हा सामान्य रुग्णालयातील 108 ॲम्बुलन्स विभागाच्या जिल्हा व्यवस्थापकाच्या जाचाच कंटाळून ॲम्बुलन्स चालकाने ५ मे २०२४ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ नुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात जिल्हा व्यवस्थापक प्रमोद हिवराळे याला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. लोखंडे यांच्या न्यायालयाने आज अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी, की हिंगोली शहरातील रीसाला बाजार भागात कळमनुरी येथील ॲम्बुलन्स चालक सुनील नारायण शिंदे हा भाड्याच्या खोलीत राहत होता. दिनांक ५ मे २०२४ रोजी त्याने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने त्याच्या मृत्यूबाबत 108 ॲम्बुलन्स विभागाचा जिल्हा व्यवस्थापक प्रमोद हिवराळे याला जबाबदार धरले होते. जिल्हा व्यवस्थापक हिवराळे यांच्या जाचास कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले होते. त्यांनतर मयताचा भाऊ अनिल शिंदे याच्या फिर्यादीवरून आरोपी जिल्हा व्यवस्थापक प्रमोद उकंडा हिवराळे याने हिंगोली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. 
दिनांक २१ मे २०२४ रोजी या जामीन अर्जावर सरकार आणि आरोपी पक्षाचा युक्तिवाद झाला. यावेळी आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. रावण धाबे यांनी मयत अनिल शिंदे याचा नोकरी दरम्यानचा पूर्व इतिहास मांडला. तसेच मयताच्या मृत्यूस आरोपी प्रमोद हिवराळे जबाबदार कसा नाही, त्याचबरोबर आरोपी हिवराळे याने मयतास आत्महत्या करण्यासाठी अपप्रेरणा दिली नाही हे न्यायालयाच्या निदर्शनास सबळ पुराव्यानिशी आणून दिले. 

न्यायालयाने सरकार आणि आरोपी पक्षाचा युक्तिवाद ऐकून आज आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. यावेळी आरोपीच्या वतीने ॲड. रावण धाबे युक्तिवाद केला. तर यांना ॲड. नागेश अंभोरे, ॲड. नितीन शिखरे यांनी सहाय्य केले.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने