अटक वॉरंट आरोपीला न्यायालयात हजर न राहता सुद्धा रद्द करता येईल

अनेक प्रकरणात आरोपी विरुद्ध अटक वॉरंट काढला जातो. हा वॉरंट रद्द होत नाही, तोपर्यंत न्यायालयात पुढील स्टेप्स घेतल्या जात नाहीत आणि त्यामुळे प्रकरण प्रलंबित राहते आणि आरोपीवर अटकेची सुद्धा तलवार राहते. मात्र आरोपीला न्यायालयात हजर न करता, त्याच्या अनुपस्थितीत सुद्धा त्याच्या विरोधात बजावण्यात आलेला वॉरंट रद्द करता येतो.
मात्र यासाठी अनुपस्थिती बाबतचे ठोस कारण पुराव्यासह न्यायालयात द्यावे लागेल आणि मेरिटवर वॉरंट रद्द करण्याचा अर्ज निकाली निघेल. अरुणकुमार विरुद्ध महाराष्ट्र सरकार , रिट पीटिशन 4429/2013 या प्रकरणात न्यायमूर्ती एम. एल. तहालियानी यांनी आदेश पारित केले आहेत. अटक वॉरंट बजावण्याचा हेतू, आरोपी न्यायालयात हजर रहावा, त्याच्या समोर प्रकरण चालविले जावे आणि त्याच्यावर कायद्याचा वचक रहावा हा आहे.

लेखक- ॲड. रावण धाबे, हिंगोली.
Mob. No. 6003000038

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने