Hingoli Session Court: फसवणूक आणि हुंडा प्रतिबंध गुन्ह्यात डॉक्टरसह ६ आरोपींना जामीन

हिंगोली: येथील सत्र न्यायालयाने फसवणूक तसेच हुंडा प्रतिबंध आणि सासरच्या मंडळी छळ होत असलेल्या बाबत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात सर्व ६ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. The Hingoli sessions Court has allowed anticipatory bail to all the 6 accused in dowry and cheating case registered at Hingoli Rural Police station.
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत भारतीय दंड संहितेचे कलम 498A, 420, 504, 506, 406, 34 तसेच हुंडा प्रतिबंधक अधिनियमाचे कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल झाला होता. दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार फिर्यादी महिला XYZ धंदा- नोकरी, राहणार, द्वारा पोलीस निरीक्षक सोनाजी सूर्यभान आमले, पोलीस वसाहत, गंगानगर हिंगोली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी त्रिंबक हरिभाऊ बुरकुले, उत्तम हरिभाऊ बुरकुले, ज्योती उत्तम बुरकुले, बाळासाहेब हरिभाऊ बुरकुले, रेणुका बाळासाहेब बुरकुले, रामभाऊ झिंगाजी कुरडे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीनुसार, त्र्यंबक हरिभाऊ बुरकुले यांचा विवाह फिर्यादी महिले सोबत झाला आहे. आरोपी लोकांनी फिर्यादी आणि फिर्यादीचे वडीलाकडून विविध कारणांसाठी घेतलेले 17 लाख 90 हजार रुपये आरोपींनी परत केले नाही. तसेच लग्नापूर्वी आरोपींकडे 15 एकर शेती असल्याचे खोटे आश्वासन दिले आणि माहेराहून 20 लाख रुपये घेऊन ये या मागणीसाठी फिर्यादीचा छळ केला अशा आशयाची तक्रार भरोसा असेल हिंगोली येथे दाखल झाली.

याबाबत तडजोड न झाल्याने सदर फिर्यादीने हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर आरोपीने ॲड. रावण धाबे यांचे मार्फत हिंगोली येथे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयामध्ये आरोपींच्या वतीने फिर्यादीने लावण्यात आलेल्या खंडन करण्यात आले. फिर्यादी महिलाही पेशाने डॉक्टर असून आरोपी आणि फिर्यादी व फिर्यादीचे वडील हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांना एकमेकांची पार्श्वभूमी माहिती आहे. असे असतानाही आरोपींकडून फिर्यादी आणि तिचे वडिलांना खोटे आश्वासन देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तसेच झालेली सोयरक आणि प्रत्यक्षात झालेला विवाह यामधील अंतर पाहता फिर्यादीने संपूर्ण शहानिशा करूनच आरोपी क्रमांक 1 सोबत विवाह केला. तसेच फिर्यादीची हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झालेली फिर्यादी केवळ योगायोग नाही. फिर्यादी हिचे वडिल नांदेड येथे राहतात. तर फिर्यादी ही आज रोजी हिंगोली जिल्ह्याच्या बाहेर नोकरी करते. आणि फिर्यादीने फिर्यादीत नमूद केलेला बहुतांश घटनाक्रम हिंगोली जिल्ह्याच्या बाहेर घडलेला आहे. असे असतानाही फिर्यादीची फिर्याद हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल का झाली याचे कारण, फिर्यादीचे वडील सोनाजी सूर्यभान आमले ग्रामीण पोलीस ठाण्यात ठाणेदार आहेत. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ही फिर्याद आपल्याच पोलीस ठाण्यात दाखल कशी होईल आणि आरोपींना कसे अडचणीत आणता येईल यासाठी पदाचा दुरुपयोग केला असल्याचे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. तसेच हुंडा प्रतिबंधक कायद्याखाली फिर्यादीने लावण्यात लावलेल्या आरोप हे सुद्धा बिनबुडाचे आहेत. 

फिर्यादी आणि तिचे वडील उच्चशिक्षित आहेत. असे असताना सुद्धा त्यांनी हुंडा दिला कसा आणि ज्यावेळी आरोपीने हुंड्याची मागणी केली त्यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यात फिरत का दिली नाही? ही बाब सुद्धा समोर आणली. तसेच फिर्यादी महिलाही तिचे पतीसोबत लग्न झाल्यानंतर केवळ 5 ते 6 महिने राहिली आणि त्यानंतर तिने घर सोडले. त्यानंतर अनेक प्रयत्न करूनही फिर्यादी नांदायला येत नसल्याने तिचे पती आरोपी क्रमांक 1 यांनी, वसमत येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) यांचे न्यायालयात फारकतीचा दावा दाखल केला असल्याची बाब सुद्धा आरोपीच्या वतीने न्यायालयासमोर आणली. 

सरकार पक्षाने केलेला आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश डी. जी. कांबळे यांचे  न्यायालयाने आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपींच्या वतीने ॲड. रावण धाबे, ॲड. नागेश अंभोरे, ॲड. नितीन शिखरे यांनी बाजू मांडली.

The Editor

भारतीय संविधान आणि भारतीय कायद्यांबाबत, तसेच कायदीय चालू घडामोडी, न्यायालयांचे निकाल, निर्णय, आदेशा याबाबत मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून वाचकांना ज्ञान मिळावे यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे. कायद्याचे अभ्यासक, वकील, विद्यार्थी हे सुद्धा या ब्लॉगवर आपले लेख प्रसिद्ध करू शकतात. संपर्क:- अ‍ॅड. रावण धाबे, raavan@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने